अंबरनाथ: पश्चिम स्वामीनगर परिसरात गांजा पिणाऱ्या तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घेतले ताब्यात
अंबरनाथ पश्चिम स्वामीनगर परिसरात एक तरुण मंगळवारी सकाळी सात वाजता अमली पदार्थ म्हणजेच गांजा पीत होता. मात्र या परिसरातून काही नागरिक ये-जा करत असताना त्यांना या गांजा पिणाऱ्या तरुणाचा त्रास झाल्याने, त्यांनी फिर्यादी म्हणून अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. अंबरनाथ पश्चिम पोलीसचे चंद्रकांत सावंत हे अवघ्या काही वेळातच पोहोचले आणि दीपक गुप्ता ह्या तरुणाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत आहेत