हिंगणघाट: धोत्रा चौरस्त्यावर रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला ट्रकच्या धडक: दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार:तर वडील जखमी
हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा चौरस्त्यावर रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार झाला तर वडील गंभीर जखमी झाले.प्राप्त माहितीनुसार मृत्यक दुचाकीस्वार योगेश महाजन वय २९ वर्ष राहणार एकुर्ली हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 32 ए.व्ही 9692 ने वडील शंकर महाजन यांना घेऊन धोत्रा चौरस्त्यावरून सोनेगाव स्टेशनला जाण्याकरता रोस्ता ओलांडत असताना ट्रक क्रमांक एम एच १६ सी. सी ७५७५ ने जबर धडक दिली.