हिंगणघाट: नांदगाव चौकातील उडान पुलावर मोठे पडले भगदाड:राकॉपा शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वांदिले याची चौकशीची मागणी
हिंगणघाट शहरांतून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील नांदगाव पुलावर चार वर्षात दुसऱ्यांदा मोठे पडले आहे.यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी ३० जुन रोजी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.