शहादा: अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्यावरील धमडाई फाट्याजवळ अज्ञात ट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला उलटले
अंकलेश्वर- ब्रहाणपूर रस्त्यावरील धमडाई फाट्याजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला अज्ञात ट्रक चालकाने मागून धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. सदर उसाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटल्याने उसाचे नुकसान झाले आहे.सदर घटनेमध्ये कुठलीही हानी झाली नाही मात्र उसाचे व ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती ट्रॅक्टर चालक यांनी दिली आहे. अज्ञात ट्रक चालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे.