राळेगाव: राळेगावतील शेतकऱ्याचे विषारी औषध घेतल्याने दु:खद मृत्यू
राळेगाव शहरातील शेतकरी सदाशिव कोहळे यांचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्जमाफी मिळाल्यानंतरही पीक कर्ज न मिळाल्याने आणि हवामानामुळे पिकांची दयनीय अवस्था असल्याने ते विवंचनेत होते. राळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.