भिवापूर: शाळेत चुलीवर शिजविला जातोय पोषण आहार गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा हजारांवर शाळांना फटका
जिल्ह्यात २७११ शाळांमध्ये पोषण आहार दिला जात असून २०४७शाळांमध्ये आहार गॅस सिलिंडरचा वापर करून शिजविला जातो. परंतु देशभरात गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे व्यावसायिक सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच्या फटका शालेय पोषण आहाराला बसला आहे.जिल्ह्यातील हजारांवर शाळांमध्ये पोषण आहार चुलीवर शिजवावा लागत आहे.सात दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरविण्याबाबत पत्र दिले होते.