SRA कडे कोणताही प्रस्ताव नाही ! बालाजी नगर मध्ये संमती पत्राच्या नावाखाली मनमानी कारभार लोक जनशक्ती पार्टीचा जन आंदोलनाचा इशारा
#pimprichinchwad #balajinagar #sra #SRAProject #pcmc
पिंपरी-चिंचवड:
शहरातील बालाजी नगर झोपडपट्टी परिसरात एसआरए (SRA) प्रकल्पाच्या नावाखाली काही कथित बिल्डरांकडून सुरू असलेली मनमानी उघडकीस आली आहे. एसआरए प्राधिकरणाकडे असा कोणताही प्रस्ताव दाखल नसताना नागरिकांकडून संमतीपत्रे भरून घेतली जात असल्याचा आरोप लोक जनशक्ती पार्टीने केला आहे.
एसआरए अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे या भागात असा कोणताही प्रस्ताव दाखल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही सुमारे ६,००० कुटुंबांची दिशाभूल करून संमतीपत्रे गोळा केली जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही बोगस पत्रावर सह्या करू नयेत, असे आवाहन पक्षाने केले असून ही फसवणूक न थांबल्यास येत्या ८ दिवसांत तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Pune City, Pune | Sep 16, 2026