रामटेक: रामटेक शहरात उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य उत्सव
Ramtek, Nagpur | Aug 15, 2026 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनी रामटेक शहरातील विविध शासकीय, अर्थशासकीय,स्वायत्त संस्था, शैक्षणिक, सहकारी संस्था, पत संस्था तसेच सार्वजनिक चौकात ध्वजारोहण समारोह अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रगान, राष्ट्रगीत, वंदे मातरम, महाराष्ट्र गीत गायली गेली. काही ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.