मुलांच्या जीवाशी खेळ ! वय १८, लायसन्स नाही. तरीही स्कूल बस चालक. शाळेचा भोंगळ कारभार उघड !
#bavdhan #poilce #schoolbus #students #driving
पुण्यातील बावधन परिसरातील जे. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा चालक केवळ 18 वर्षांचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित बस रस्त्यावर अतिशय जवळून चालवली जात असल्याचा संशय आल्याने चालकाला थांबवून त्याचे वय आणि परवान्याबाबत विचारणा केल्यावर हा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात आले.
बसमध्ये लहान वयाची मुले प्रवास करत असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली
Pune City, Pune | Sep 17, 2026