अक्कलकुवा: केलाखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास आता थांबणार लवकरच नदीवर होणार पूल,अधिकाऱ्यांची पाहणी #Jansamasya
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलाखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागत होती. झाडांच्या फांद्या पकडून विद्यार्थी नदी पार करत होते. ही बातमी पब्लिक ॲपने प्रसिद्ध केली. जिल्हा प्रशासनाकडून बातमीची दखल घेण्यात आली असून दोन जुलै रोजी दुपारी नदीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून लवकरच या नदीवर लोखंडी पूल उभारला जाणार आहे.