अक्कलकुवा: केलाखाडी पाड्यातील शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नदीवरून झाडाच्या फांदीला धरून जीवघेणा प्रवास #Jansamasya
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील केलाखाडी पाड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जीव मुठीत घेऊन नदीवरून झाडाचे फांदी धरून शाळेत जात आहे. पाड्यावरून शाळेत जाण्यासाठी नदीवरून कुठलाही पूल उपलब्ध नसल्याने विद्यार्थी जीव मुठीत धरून हा जीवघेणा प्रवास करीत आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नदीवर लोखंडी पूल बनवण्यात येईल अशी माहिती दिली आहे.