अक्कलकुवा: मोलगी गावातून आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास ;चाळीसगाव तालुका नायडोंगरी आश्रमशाळा शिक्षकांचा प्रताप
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोलगी गावातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणा प्रवास सुरूच आहे.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात येणाऱ्या नायडोंगरी आदिवासी आश्रम शाळेतील प्रकार पाहायला मिळाला आहे. मालवाहू ट्रक मधून आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवास आश्रम शाळेतील शिक्षकांनी घडवला आहे. या मालवाहू वाहनात भरले चक्क चाळीस विद्यार्थी गुरांप्रमाणे भरले होते.