आमदार असल्याचा बनाव पडलं महाग; वाकड पोलिसांकडून फॉनर चालकावर गुन्हा दाखल !
#pimprichinchwad #wakad #punepolice #blackfilming
#fir
पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्पटे वस्ती येथील ॲम्बिअन्स हॉटेलसमोर सांगवी वाहतूक विभागाच्या पथकाने कारवाई करत एका फॉर्च्युनर चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
पोलीस शिपाई सुधीर कैलास साबळे यांच्या फिर्यादीनुसार १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना एक संशयित काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार क्रमांक MH14KQ0125 काळ्या काचा लावून जात असताना आढळली.
पोलिसांनी गाडी थांबवून चालक बापू मच्छिंद्र ढेरे याच्याकडे चौकशी केली असता ही गाडी रोहन जगन्नाथ काटे यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. या वाहनाच्या पुढील काचेवर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार' असा शासकीय लोगो बेकायदेशीरपणे लावण्यात आला होता.
चालकाच्या किंवा मालकाच्या घरात कोणीही आमदार नसताना केवळ लोकांमध्ये भास निर्माण करून