हिंगणघाट: शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरी, पोलिसांत तक्रार दाखल
हिंगणघाट शहरात तिन वेगवेगळ्या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी तिन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची माहित पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार उमाकांत कचाटे यांची दुचाकी क्रमांक एम.एच ३२ ऐ.ऐ.६८९२ नंदोरी चौकातील चायाचे दुकाना समोरुन चोरून नेला तर गौर थोटे यांची दुचाकी क्रमांक एम एच ३२ ए.ए.१५९४ कॉटन मार्केट परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेला तर तिस दुचाकी क्रमांक ए.पी २५ ए.एम ६७५२ हि निशानपुरा वार्डातून चोरून नेली आहे.