हिंगणघाट: डायगव्हाण शिवारात अवैध गावठी दारू गाळपणाविरोधात पोलिसांची कारवाई, १ लाख १ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला नष्ट
हिंगणघाट पोलिसांनी डायगव्हाण शिवारात अवैध गावठी दारू गाळपाणा विरोधात कारवाई करीत १ लाख १ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार पोलिसांना डायगव्हाण शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचे गाळपाण होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली असता याठिकाणी झाडाझूडपात मोठ्या प्रमाणात मोहा सडवा जमिनीत गाडून आढळून आला यावेळी पोलिसांनी १ लाख १ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करू नष्ट केला.