हिंगणघाट: शहर पोलिसांची नाकाबंदी करून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई:२२ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांनी शहराकडे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला नाकाबंदी करून दुचाकी व दारू असा एकुण २२ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली.प्राप्त माहितीनुसार १० जुलै रोजी विजय शरद राउत वय २६ वर्ष राहणार खैराटी पारधी बेडा हा खैराटी पारधी बेड्याकडून हिगणघा कडे गावठी मोहा दारूची दुचाकीने वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून विजय शरद राउत यास ताब्यात घेऊन त्याचा ताब्यातून एम.एच ३२ एच ११४१ सह दारु असा एकुण २२ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.