कुही: कन्हेरी शेतशिवारात वाघाने केली बैलाची शिकार
Kuhi, Nagpur | Mar 15, 2026 ग्रामीण भागात असलेल्या राजोला जिल्हा परिषद क्षेत्रातील कन्हेरी शेतशिवारात शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून बैलाची शिकार केल्याची घटना 15 मार्च रविवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले.