महालगाव उपकेंद्रात सिकलसेल व कर्करोग जनजागृती
847 views | Tirora, Gondia | Feb 15, 2026 तिरोडाः - प्रा आ केंद्र दवनिवाडा अंतर्गत येणाऱ्या महालगाव उपकेंद्र येथे १४ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रामुख्याने सिकल सेल तपासणीसह असंसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात सिकल सेल आजाराची विशेष तपासणी करण्यात आली.