बदनापूर: बावणे पांगरी परिसरात 5 एकर कपाशी पिकावर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर
Badnapur, Jalna | Aug 11, 2026 आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी येथे शेतकरी अर्जुन शिंदे यांनी त्यांच्या 5 एकर क्षेत्रफळावर पावसाळ्यात कपाशी पिकाचे लागवड केले होते मात्र या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांनी विविध प्रकारचे कीटकनाशक फवारले काहीही फायदा न झाल्याने आज त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखोंची नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातून होत आहे.