अक्कलकुवा: केलाखाडी परिसरात नदी व रस्त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जि प एम सावनकुमार यांनी केली पाहणी #Jansamasya
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलाखाडी परिसरात विद्यार्थी नदी ओलांडांना झाडांच्या फांद्या पकडून धोकेदायक प्रवास करणारी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीच्या दखल घेत 3 जुलै रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याच वेळी बांबूच्या झोळीतून सर्पदंश झालेल्या रुग्णाला पाहून ते अवाक झाले. त्यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाची काळजी घेण्यासंदर्भात सूचना केल्या.