अक्कलकुवा: अक्कलकुवा विधानसभेत मंजूर विकास कामे अद्यापर्यंत सुरू झाले नसल्याने ठेकेदारांवर व इंजिनिअरवर कारवाई करा; आमदार पाडवी
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात 36 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु अद्यापही विकासकामे ठेकेदारांनी सुरू केली नाहीत. त्यामुळे या ठेकेदारांवर व दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित इंजिनिअर वर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभेत दि. 3 जुलै 2025 रोजी दुपारी प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.