मुंबई उपनगर: दापचरी आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्पाला गती, १४०० एकरात जागतिक दर्जाचा फूड हब
दापचरीतील आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्पाला पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. १४०० एकरात शेतमाल खरेदी, पॅकेजिंग, शीतसाखळी व निर्यात सुविधा दिल्या जात आहेत. वाढवण पोर्ट, विमानतळ आणि बंदरांशी जोडणी होणार आहे.