महाड: महाड बसस्थानकात शिवशाहीबसच्या नावाने फसवणूक
Mahad, Raigad | May 12, 2026 आम्हाला शिवशाही बस द्या नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत करा संतप्त प्रवाशांची एसटी व्यवस्थापनाकडे मागणी केल्याची घटना समोर आली आहे. ९ मे रोजी महाड एसटी स्थानकात एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ऑनलाइन बुकिंग करून शिवशाही बसचे तिकीट घेतलेल्या प्रवाशांना ऐनवेळी साधी लाल डबा एसटी लावण्यात आली.