परतूर: गोळेगाव सह परतुर तालुक्यात सोयाबीन पिके झाली होत्याची नव्हती, शेतशिवारात स्मशान शांतता
Partur, Jalna | Oct 8, 2026 आज दिनांक 8 ऑक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील गोळेगाव सह इतर भागांमध्ये शेत शिवारात शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुकलेल्या पाहायला मिळत आहे यामुळे सर्वत्र समशान अशी शांतता शेत शिवारात पाहायला मिळत आहे कारण पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात केलेली ही सोयाबीनची अशी अवस्था झाली असून यामुळे शेतकरी राजा पार चिंतेत सापडला असून संपूर्ण तालुक्यात व इतर भागांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.