भोकरदन: विधान भवन येथे आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पंचायतराज समितीची आढावा बैठक
आज दिनांक एक ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7:30 वाजता मुंबई विधान भवन येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतराज समितीची आढावा बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये जळगाव जिल्हा परिषदेत संदर्भातील सचिवांच्या साक्ष घेतली व राज्याच्या विविध मुद्द्यावर चर्चा झाली आहे यावेळी पंचायत राज समितीचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित झाले होते.