तिरोडा : प्राथमिक आरोग्य केंद्र दवनिवाडा अंतर्गत येणाऱ्या महालगाव उपकेंद्र येथे १४ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रामुख्याने सिकल सेल तपासणीसह असंसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.