हिंगणघाट: कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिक संविधान चौकात रस्त्यावर:तब्बल एक तास रोखला महामार्ग
हिंगणघाट शहरातील कलोडो सभागृहापुढील झोपडपटी उठविण्यासाठी म्हणून राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला आला. संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांचे दुसरी कडे पुनर्वसन करान्यायासाठी हा रस्ता रोखण्यात आला. महाविकास आघाडीचे सर्व नेते व परिसरातील नागरिक संविधान चौकात बसून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जवळपास १ तास मार्ग रोखून धरला