हिंगणघाट: दोन वर्षापासून बंद असलेल्या शहर पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्र पुन्हा सुरू, ठाणेदार ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
हिंगणघाट शहरातील पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली होती.मात्र काही कारणास्तव हे केंद्र बद होते.या केंद्राच्या माध्यमातून महिला समुपदेशन मिळावे यासाठी पुन्हा आज ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचे रीतसर उदघाटन करण्यात आले.आता या केंद्राच्या माध्यमातून हिंगणघाट शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांना समुपदेशन दिले जाईल यामुळे यापासून महिलांना याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले.