हिंगणघाट: काजळसरा रोडवर शहर पोलिस ठाण्याच्या पथकाची अवैध दारू वाहतूकी विरोधात कारवाई
हिंगणघाट येथील पोलिस ठाण्याच्या पथकाला माहीती मिळाली की, आरोपी सुशी कडू वय हा सेलू मोरपाड गावाकडून काजळसरा गावाकडे देशी दारू ची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून पोलिस कर्मचारी प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी काजळसरा रोडवर नाकेबंदी करुन आरोपी सुशील कडू रा सेलू याचेवर प्रोरेड केला असता आरोपी हे त्याचे ताब्यातील हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक .एम.एच 32 एम 4028 ने देशी दारुची वाहतुक करतांना आढळून आला.