हिंगणघाट: प्रहारचे गजू कुबडे यांचे मार्गदर्शनात दिव्यांगानी २५ पायऱ्या चढून न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले विविध मागण्याचे निवेदन
हिंगणघाट नगरपालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांच्या हक्काच्या मागण्यासाठी प्रहारचे रुग्णमित्र- गजूभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषदेच्ऐ मुख्याधिकारी यांना दिव्यांगानी२५ पायऱ्या चढून निवेदन दिले.दिव्यांगानी निवेदनातून दिलेल्या मागण्यांच्या निवेदनानुसार मागण्या खालील प्रमाणे आहेत.२०१७ मध्ये नगरपालिका च्या आमसभेतील ठरावानुसार दिव्यांग बांधवांचे घरटॅक्स माफ करण्यात यावे,ज्या दिव्यांग बांधवाकडे स्वतःची जागा नाही त्यांना जागेसहीत घरकुल मंजूर करून घरकुल देण्यात यावे.