हिंगणघाट: नुतन शाळेचे ग्राऊंड जवळ पोलिसांची एमडी मॅफेड्रॉन विरोधात कारवाई:१ लाख ८ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांनी नुतन शाळेचे ग्राऊंड जवळ पोलिसांनी एमडी मॅफेड्रॉन विरोधात कारवाई करीत एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून १लाख ८ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यासंबंधी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख साबीर शेख नूर अल्ली हा जवळ एमडी मॅफेड्रॉन घेऊन असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी रेड करून कारवाई करीत आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे