वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे हरविलेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत
(वाठार पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी)
श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ.वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे श्री. सुशिल भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेणेकामी वाठार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण (डी. बी.) पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची मोहिम श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा,श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोउनि. गहिणीनाथ सातव,पोउनि. नितीन भोसले, पो.हवा. तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पो कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केलेली आहे.
19 views | Satara, Maharashtra | Jun 13, 2026