हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित “हर घर तिरंगा” अभियानाच्या अनुषंगाने आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.
या तिरंगा रॅलीचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी केले. रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार, विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तिरंगा रॅलीदरम्यान देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाप्रती आदर व अभिमान व्यक्त केला. यावेळी रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तिपर गीत तसेच राष्ट्रगीताचे मनमोहक वादन करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ केली. या उपक्रमाद्वारे “हर घर तिरंगा” अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #tiranga #rally #ratnagiri #RatnagiriPolice
21 views | Ratnagiri, Maharashtra | Aug 14, 2026