रामटेक: मनसर येथे दोन दुचाकीच्या धडकेत एका दुचाकी चालक युवकाचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Aug 16, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर मोक्षधाम समोर महामार्गावर दोन दुचाकीच्या आमोरासमोर धडकेत दुचाकी चालक एका 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना 15 ऑगस्ट ला रात्री आठ वाजता च्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव ऋषी अजय पाटील वय अंदाजे 28 वर्षे रा. वार्ड क्रमांक तीन मनसर भट्टा असे आहे. तो रात्री मनसर वरून सर्विस रोडने दुचाकीने आपल्या घराकडे जात असल्याचे समजते.