गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी 'HPV' लसीकरण हेच प्रभावी कवच: डॉ. अभिजीत गोल्हार यांचे आवाहन
5.5k views | Gondia, Maharashtra | Mar 20, 2026 महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकणाऱ्या 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग' (Cervical Cancer) या आजाराला रोखण्यासाठी आता आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी एका विशेष संदेशाद्वारे जिल्ह्यातील पालकांना आणि मुलींना HPV (Human Papillomavirus) लसीकरण करून घेण्याचे कळकळीचे अवाहन केले आहे