खुलताबाद: एएफकेजी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचा मतदान जागरुकता मिशन, निवडणुक निर्णय अधिकारीही झाले प्रभावित!
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी शहरातील अपॉस्टोलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश स्कूलला भेट देण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ, सहायक निर्णय अधिकारी व प्रशासक शेख समीर आणि शिक्षण विकास अधिकारी विलास केवट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे अनोखे प्रदर्शन सादर केले होते.