रामटेक: गहू तलाव रामटेक परिसरातील धानाच्या बांध्यात काम करताना सर्पदंशाने एका 35 वर्षीय युवकाचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Aug 10, 2026 पो.स्टे. रामटेक अंतर्गत येणाऱ्या तसेच रामटेक शहराच्या पश्चिम सीमेवर असलेल्या गहू तलाव परिसरातील आपल्या धानाच्या बांध्यात खाद टाकताना एका विषारी सापाच्या दंशाने एका 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 10 ऑगस्टला सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली . मृतक युवकाचे नाव मंगेश इकराज वरखडे वय 35 वर्ष राहणार किरणापुर असे असून तो विवाहित होता.