भोकरदन: रेलगाव येथे आ. संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते3कोटी 15 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते 3 कोटी 15 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे, यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मंगल कार्यालय बांधकाम करणे, ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे यासारख्या विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.