कळमेश्वर: श्री संत सावता मंदिरात हरिपाठाचे आयोजन, भक्तिमय वातावरणात भाविकांची उपस्थिती
श्री संत सावता मंदिर, कळमेश्वर येथे भक्तिमय वातावरणात हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यावेळी संत सावता महाराजांच्या भक्तीपर अभंगांचे गायन, हरिनामाचा गजर आणि सामूहिक हरिपाठ करण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.