अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व येथे मोतीराम पार्क परिसरातील सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन
अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क येथे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या मोतीराम पार्क परिसरातील सभामंडपाच्या कामाचे भूमीपूजन आज शनिवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान भन्ते कश्यप यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख नरेश मोरे, संतोष शिंदे, युवासेना विधानसभा अधिकारी हेमंत जाधव, भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ तालुका कार्यालयीन सचिव संतोष पगारे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.