अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व गावदेवी मैदान भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन, आमदार किणीकर यांनी दिली भेट
अंबरनाथ पूर्व गावदेवी मैदान येथे स्व. राजू मोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असून या कार्यक्रमास आज गुरुवार दिनांक १४ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ८ च्या सुमारास आमदार बालाजी किणीकर यांनी उपस्थित लावली तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे, पूनम वारिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अप्पा मालुसरे, भाजपचे उपशहरप्रमुख दिपक कोतेकर, शिवसैनक विकास सोमेश्वर, विभाग प्रमुख संतोष शिंदे उपस्थित होते.