पालघर: सफाळे परिसरात रस्त्यावर कोसळले भले मोठी झाड
पालघर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोसाट्याचा वारा व पावसामुळे सफाळे येथे रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. कुर्लाई मंदिर परिसरातील रस्त्यावर भले मोठे झाड कोसळले, रस्त्याच्या लागत असलेल्या घराच्या पत्रांवर देखील हे झाड पडले. यामुळे परिसरातील वाहतूक व राहदारी पूर्णपणे बंद झाली व पुरवठा देखील खंडित झाला. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आणि पत्रावर पडलेले हे झाड बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही.