C-60 चे जनक श्री. के. पी. रघुवंशी यांचा महाराष्ट्र पोलीस दलाकडून गौरव!
पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात C-60 दलाचे संस्थापक श्री. के. पी. रघुवंशी (भा.पो.से., सेवानिवृत्त) यांचा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गडचिरोली परिक्षेत्रात सेवा बजावलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला.
1990 मध्ये अवघ्या 60 निवडक जवानांसह सुरू झालेल्या C-60 दलाने चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या दीर्घ प्रवासात 244 पोलीस अधिकारी व जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. C-60 च्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी दलातील अधिकारी व जवानांना 03 शौर्यचक्र, 06 राष्ट्रपती शौर्य पदके आणि 358 पोलीस शौर्य पदकांनी गौरविण्यात आले.
मे 2026 मध्ये गडचिरोली जिल्हा सशस्त्र माओवादी कॅडरपासून मुक्त झाल्याचे नमूद करत, आज महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओव�
209 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 3, 2026