धुळे: अक्कलपाडा धरणातून ३२१० क्यूसेक्स विसर्ग, पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा
Dhule, Dhule | Aug 24, 2024 पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाणीसाठा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून आज दुपारी १.३० वाजता ३ हजर २१० क्युसेक इतका पाणी विसर्ग करण्यात आला आहे. पुढील काही तासांत हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन धुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापडकर यांच्यासह कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग आणि सहाय्यक अभियंता श्रेणी-१, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग यांनी केले आहे.