अक्कलकुवा: श्री महाकाली माता मंदिर येथे श्री हनुमानजी व श्री शनिजी महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त शोभायात्रा
08 जुलै ते 10 जुलै दरम्यान प.पू.संत श्री तारादासजी बापू यांच्या निगराणीत, व्यास गुरुपौर्णिमा व श्री हनुमान महाराज, श्री शनि महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 08 जुलै रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकुवा शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी ब्राह्मण द्वारा यज्ञकर्म आरंभ करण्यात आले व संध्याकाळी प्रति दिवस राम नाम संकीर्तन भक्त गण द्वारा करण्यात येणार आहे