अक्कलकुवा: पिंपळखुटा गावातील बर्डीपाडा येथे आदिवासी बांधवाचे घर आगीत जळून खाक
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा गावात बर्डीपाडा येथे बापा राऊत या आदिवासी बांधवांच्या आज दुपारच्या वेळेत घराला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाला आहे. घरात ठेवलेले संसार उपयोगी वस्तू धान्य जळून खाक झाल्याने बापा राऊत या आदिवासी बांधवावर मोठ आर्थिक संकट ओढवलं आहे. शासनानं आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.