*गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करा; डॉ. रोशन राऊत यांचे 'HPV' लसीकरणासाठी आवाहन
2.2k views | Gondia, Maharashtra | Mar 15, 2026 सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्यापुढील आव्हाने वाढत आहेत. यामध्ये 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे. मात्र, योग्य वेळी लसीकरण केल्यास या आजाराला पूर्णपणे रोखता येते. याच पार्श्वभूमीवर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी गोंदिया जिल्ह्यातील १४ ते १५ वयोगटातील मुलींच्या पालकांना 'HPV' (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लस घेण्याचे जाहीर आवाहन केले आहे.