जव्हार: सफाळे पूर्वेत बिबट्याची चाहूल; दहिसर वन विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील साखरे परिसरात शनिवारी सायंकाळी बिबट्याची चाहूल लागली. दहिसर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून बिबट्याला हुसकावू नका, असा इशारा दिला आहे.