जव्हार: मोख्याचापाडा येथे हनुमान मंदिर वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा
Jawhar, Palghar | Apr 24, 2024 जव्हार तालुक्यातील मोख्याचापाडा येथे हनुमान मंदिर वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला हनुमान मंदिर येथे विधिवत पूजाअर्चा करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन कीर्तन या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आले. विक्रमगडचे आमदार, पालघर माजी खासदार यांनी देखील या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी परिसरातील मान्यवर, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.