भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जव्हार नगर परिषदेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक, महिला, तरुणतरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.